शिवाजी महाविद्यालयात लोकनेते वसंतराव धोत्रे यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्थानिक : श्री शिवाजी महाविद्यलय अकोला येथे मराठी विभागाच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष,माजी सहकार राज्यमंत्री, लोकनेते वसंतराव धोत्रे यांच्या जयंती निमित्त “नाट्य अभिवाचन” कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. नाना वानखडे, डॉ. नितीन मोहोड, डॉ. आशिष राऊत, डॉ. संजय पोहरे, डॉ. पी. पी. देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर पुलवामातील शहीद सैनिकांना व माजी आमदार तुकाराम बिरकड यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय पोहरे यांनी केले.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. भिसे म्हणाले-“वसंतराव धोत्रे एक आदर्श माणूस होता. त्यांच्याप्रति आदरयुक्त भीती होती. त्यांनी कधी जाती-भेद पाळला नाही, आज आमच्या सारख्या अनेक लोकांचे भविष्य त्यांनी घडवले. परंतु यापेक्षा किती-तरी मोठ्या उंचीचे हे व्यक्तिमत्व होते. या जयंती कार्यक्रमतून नव्या पिढीला त्यांचे विचार पोचविण्याचे काम होत आहे.

त्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.” या कार्यक्रमात लोककवि विठ्ठल वाघ यांच्या वऱ्हाडी नाटक ‘अंधारयात्रा’ याचे विद्यार्थ्यानी अभिवाचन केले. यामध्ये सहभागी विद्यार्थी नेहा तायडे, मयूरी वाहाने, अक्षय गवई,आरती महानकार, अविराज आडाखे, वर्षा इंगोले, कोमल भगत,रोहण मोरडे,साक्षी तायडे या मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी डॉ.रणजीत भडांगे, डॉ.समिधा कडू, प्रा.अतुल यादगीरे,प्रा. सुनील मावस्कर, डॉ. संजय काळे, डॉ. कपिल म्हैसने, डॉ. थोरात, डॉ. रावसाहेब काळे, प्रा.गणेश मेनकार, डॉ. अनघा सोमवंशी, प्रा,आकाश हराळ, प्रा.निशा देशमुख, ऋतुजा मुरेकर, अर्चना देशमुख आदी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नेहा तायडे हिने तर आभार डॉ.रावसाहेब काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.