
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाच्या विद्यमान अकोला जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. गायत्रीताई कांबे आणि त्यांचे पती शिवसेनेचे माजी मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष श्री. संगीतरावजी कांबे व ओमप्रकाश पाटेकर यांनी यशवंत भवन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार, ओबीसी नेते गोपाल राऊत, सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, सनाउल्ला शहा यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.