व्याळा येथील शिवसेना कार्यकर्ते तथा धनगर समाज युवक संघटना बाळापुर तालुका अध्यक्ष संतोष भाऊ कात्रे यांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व महासचिव मिलिंदभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे कुणबी समाज नेते नंदूभाऊ वाकोडे धनगर समाज बाळापूर तालुकाध्यक्ष मनोज भाऊ करणकार, राहुल भाऊ इंगळे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी व्याळा सर्कल च्या अध्यक्षपदी त्यांना कायम करण्यात येत आहे . पुढील व्याळा सर्कलची जबाबदारी संतोषभाऊ कात्रे यांच्यावर राहील तरी सर्व पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.