शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणि सात बारा कोरा करण्याची मागणी, सुगतानंद भटकर यांचे आमरण उपोषणाचे इशारा

अकोला: विदर्भातील शेतक-यांच्या समस्या आणि त्यांच्यावर होणारा बँकांचा त्रास या पार्श्वभूमीवर शेतक-यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जाहीर केलेले आश्वासन आजही पूर्ण झालेले नाही. अकोला जिल्ह्यातील शेतक-यांचे सात बारा कोरा करणे आणि शेतक-यांना कर्जमुक्त करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आवाज उठविला आहे.

सुगतानंद भटकर यांच्या म्हणण्यानुसार, 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत शेतक-यांचा सात बारा कोरा करण्याचे व शेतकरी कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत या आश्वासनावर ठोस कार्यवाही झालेली नाही. विदर्भात, विशेषतः पश्चिम विदर्भात बँकांच्या दबावामुळे शेतक-यांची मानसिक आणि शारिरीक ताणतणावांची स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे 80 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे, असे भटकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्यांच्या शब्दांप्रमाणे, शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्वरित मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करावी, सात बारा कोरा करावा आणि शेतक-यांना कर्जमुक्त करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भटकर यांनी निवेडणातून मागणी केली आहे.

सुगतानंद भटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर 3 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे, आमरण उपोषणाच्या दरम्यान शेतक-यांना काहीही हानी पोहोचली, तर त्याची पूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर असेल,” असे भटकर यांनी कळवले आहे.या वेळि उपस्थित शरद इंगोले.गजानन दाडगे अतुल डोंगरे दुर्योधन इंगोले.विदयाधर सरकटे.विजय इंगळे.शकर इंगोले.मनोहर बसोड.

Leave a Reply

Your email address will not be published.