शास्त्री क्रीडांगणात होणार प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा

अकोला, दि. 25 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वा. होणार आहे.

मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण, पथसंचलन, कवायत व विविध कार्यक्रम होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते सकाळी 8.30 वा. ध्वजारोहण होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी, तसेच ध्वजारोहण समारंभासाठी शास्त्री क्रीडांगण, जिल्हाधिकारी कार्यालय व विविध कार्यालये सुसज्ज करण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय कार्यालयांवर तिरंग्याची प्रकाशयोजना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तिरंग्याच्या तिन्ही रंगांत उजळून निघाली.

Leave a Reply

Your email address will not be published.