“शालिमार व नाशिक मेमो गाड्यांना पारस स्टेशनवर थांबा देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी”

पारस,(प्रतिनिधी):
कोरोना काळात थांबा बंद झालेल्या शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१८०३०) आणि नाशिक-बडनेरा मेमो एक्सप्रेस (०१२११) या महत्त्वाच्या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर पुन्हा थांबा मिळावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीने भुसावळ रेल्वे विभागाकडे लेखी मागणी केली.

या मागणी अर्जाचे निवेदन माननीय सौ. आम्रपालीताई अविनाश खंडारे, महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, माजी जि.प. समाजकल्याण सभापती अकोला यांच्या नेतृत्वाखाली भुसावळचे मंडल रेल्वे प्रबंधक (डी.आर.एम.) इति पांडे मॅडम यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी पारस रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांच्यामार्फतही या मागणीचा ठराव सादर करण्यात आला.

पारस ग्रामस्थांची मागणी ठाम: ३० हजार लोकसंख्या असलेल्या पारस गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच जिल्हा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज रेल्वेने प्रवास गरजेचा आहे. पूर्वी शालिमार एक्सप्रेसला पारस येथे थांबा होता, मात्र कोरोना काळात तो बंद करण्यात आला. त्यामुळे आजही प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाला निवेदन सादर करताना उपस्थितांची गर्दी: या निवेदनप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये योगिता शेलार, उषा शेलार, अंजना सावदेकर, सुमन परसोडे, युनुस सेठ, खुर्शिद राणा, अश्विन खंडारे सर, गणेश लांडे, राहुल खंडारे, विलास इंगळे गुरुजी, मनोज खंडारे, सागर नाटेकर, तेजस मोरे, आदींचा सक्रिय सहभाग होता.

पारसकरांचे आवाहन :
“रेल्वे प्रशासनाने लोकभावना ओळखून शालिमार एक्सप्रेस आणि नाशिक मेमो या गाड्यांना पारस येथे तात्काळ थांबा द्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.