निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पाडण्याकरीता अकोला पोलीस सज्ज…….

अकोला प्रतिनिधी: प्रशिक मेश्राम

दिनांक २६.०४.२०२४ रोजी अकोला जिल्हयात ८८२ ठिकांणी १७१९ मतदान केंद्रावर लोकसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ प्रक्रीया पार पडणार आहे. त्याकरीता अकोला पोलीसांनी पुर्व तयारी केली असुन निवडणुक प्रक्रीया शांततेत पार पडण्याचे दृष्टीन एकुण ४२९५ पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड बंदोबस्ताच्या तयारीनिशी सज्ज झाले असुन त्या व्यतिरिक्त बाहेर जिल्हयातील तरोच बाहेर राज्यातील पोलीस, आर.पी.एफ.सि.आय.एस.एफ केरला आर्म फोर्स, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदाबरता करीता आहेत.

निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्या पासुन जिल्हयामध्ये गुन्हेगारीवर जरब बसविण्या करीता विशेष मोहिमेचे आयोजन गा. श्री. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहेत. त्यामध्ये अवैध दारू, अवैध रोख रक्कम, अमंली पदार्य, शस्त्रे/अग्नीशस्त्रे किंवा इतर प्रलोभनात्मक वस्तु यांचा वापर किंवा वाहतुक होणार नाही याबाबीकडे विशेष लक्ष देवुन, सराईत/ क्रियाशील गुन्हेगार, यापूर्वी निवडणुक आचार संहीता दरम्यान ज्या व्यक्तींवर गुन्हे नोंद आहेत अशा व्यक्तीवर प्रामुख्याने लदा केंद्रीत करून खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

अकोला जिल्हयात निवडणुकीच्या काळात जिल्हास्तरावर, उप-विभागीय स्तरावर तसेच पो.स्टे. स्तरावर वेळो वेळी विशेष मोहीम तसेच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सिमांतर्गत सुरू असलेल्या १७ स्थिर सर्वेक्षण पथक (SST), तसेच २४ भरारी सर्वेदाण पथक (FST), व ०२ शिघ्र कुती पथक (QRT) तैनातीस असुन निवडणुकीच्या काळात शस्त्र अधिनियमान्वये मध्ये १२ आरोपीकडुन ०६५ देशी कट्टे, ०२ गावठी बंदुक व १७ जिवंत काडतुस तसेच इतर ६३ आरोपीतांकडुन एकुण ६५ घातक शस्त्रे (२५ तलवारी १९ सुरे, ०४, कोयते, ०२ खंजीर, ०३ कत्ते, १२ चाकु) असे एकुण ६७ केसेस व ७५ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली आहे.

दारूबंदी कायद्यान्वये एकुण ५१३ केसेस मधील ५१७ आरोपीतांकडुन एकुण २४,२९२.८७ लिटर दारू जप्त करून एकुण ३२,८१,६३३/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये एकुण ०२ केसेस मधील ०८ आरोपीतांकडुन १६० किलो ६७० ग्राम गांजा किंमत ३,२१,०९४० /-रू, अवैध गुटखा प्रकरणी ०४ केसेस मध्ये ०४ आरोपीकडुन एकुण २,११,४५२/-रू चा मुद्देमाल असा एकुण विविध प्रकरणात ६७,०४,०२५ /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अकोला जिल्हयातील अभिलेखावर नोंद असलेल्या एकुण ०६ फरार व ०४ पाहीजे आरोपीतांना अभिलेखावरून अटक करण्यात आले आहे. तसेच पो.स्टे. मधील एकुण ७८५ गैरजमानती वारंट ची बजावणी करून ३५७ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

निवडणुक प्रक्रीया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता जिल्हयामध्ये एकुण ८२ रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते तसेच जिल्हा सिमाअंतर्गत नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. या वर्षी निवडणुक आयोगाने चुनाव का पर्व देश का गर्व या अनुषंगाने सोशल मिडीया च्या माध्यमातुन मतदान विषयक जनजागृती करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पळता आपण शांततेत मतदान करावे तसेच कोणताही अनुचीत प्रकार दिसुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क करावा निवडणुक प्रक्रीया पार पाडण्यासाठी अकोला पोलीस सर्तक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.