परीक्षा व मूल्यमापन मंडळावर प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांची निवड..

  अकोला- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्‍यवस्थापन परिषदेसह परीक्षा मूल्यमापन मंडळावर नामनिर्देशित करावयाच्या दोन प्राचार्य व दोन प्राध्यापक संवर्गातून प्राचार्य डॉ.अंबादास कुलट, प्राचार्य डॉ.सुभाष गवई तर विद्यापीठ पदव्‍युत्तर विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत गावंडे व संलग्नीत महाविद्यालयातून प्रा. डॉ. उमेश कडू यांचे नामनिर्देशित करण्यात आले आहे.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे व्‍यवस्थापन परिषदेतर्फे गठण करण्यात आले. त्यामध्ये अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांची निवड करण्यात आली आहे.

प्राचार्य डॉ.कुलट संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून इंग्रजी आवश्य व इंग्रजी साहित्य या  अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष व सभासद म्हणून त्यांनी अनेक वर्षे उत्कृष्ट कार्य केले आहे.  एम्‌.फील्‌ व पीएच.डी. चे मार्गदर्शक आहेत. विद्यापीठाच्या विविध प्राधिकारीणीवर ते सातत्याने कार्य करीत असतात. अध्यापन व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी महाविद्यालयाला ‘ए डबल प्लस’ गुणांकन मिळविले आहे.  प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.