बाबा तुम्हाला बालपणी पडलेला हा प्रश्न आजही डिजीटल काळात ई-युगात वावरतांना २०२३ मध्ये मला आणि माझ्या सारख्या आपल्या असंख्य लेकरांना पडतो आहे. फक्त आता शाळा नाही तर त्या ऐवजी पात्रता असुनही काम मिळत नाही म्हनुन पडतो.
युजीसी ने आता नेट-सेट उत्तीर्ण उमेदवार चं सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १ जुलै २०२३ पासुन पात्र आहेत असे सांगितले आणि सी. एच. बी.म्हणजेचं घड्याळी तासिका तत्वावर काम करण्यासाठी देखील नेट-सेट असलेला उमेदवार आवश्यक आहे. पण काही सडक्या मेंदुच्या आणि निच विचारसरणी च्या महाभागांनी त्यात आणखी एक पात्रता ॲड केली ती म्हणजे जात..
म्हणजे तुम्ही युजीसी नियमानुसार पात्र तर असायलाचं हवे सोबत तुमची जात देखील आमच्या पसंत ची असायला पाहीजे. तुम्ही जर मागासवर्गीय असाल आणि त्यातही एस.सी. प्रवर्गातील आणि त्यातल्या त्यात बौध्द तर आम्हाला अजीबात तुम्ही चालणार नाही..असा पवित्रा पदावर बसण्याची लायकी नसलेल्या या महाभागांनी घेतला आहे.
एस सी मधील दुसऱ्या जाती चालतील कारण ते फक्त जाती चा फायदा घेतात आरक्षणाचा लाभ घेतात कधीचं चळवळीत भाग घेत नाहीत आपल्या हक्का साठी रस्त्यावर उतरत नाहीत तो ठेका आंबेडकरी जनतेने घेतला आहे. आणि जीवात जीव असेपर्यंत आम्ही संघर्ष करुचं तर बाकीचे चालतात पण बौध्द नको…. हि निच मानसिकता आज दिसत आहे.
मग तुम्ही किती ही विद्वान असा,
तुम्हाला कितीही चांगले शिकवता येत असेल,
तुमच्या कडे किती ही डिग्र्या असु द्या
आमच्या कामाच्या नाहीत..
कारण तुम्ही बौध्द आहात आणी आम्हाला तुम्ही चालत नाही. इतकी भयंकर परिस्थती ही आज डिजीटल काळात आणि महासत्ता होत असलेल्या भारतात पाहायला मिळत आहे.
इतका द्वेष आणि जातीवाद डोक्यात भरलेला आहे.तो ही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ही लाजीरवाणी बाब आहे.
महत्वाच्या पदावर बसुन अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती जर असेल तर तुमच्या डिग्र्या तपासायला पाहीजेत आणि त्याच्या पूंगळ्या करुन…
इतकी चिड माझ्या शब्दात का? आली
याची कारणे सर्वांनी शोधणे गरजेचे आहे.
शासन सांगते की सर्व प्रक्रिया ही पारदर्शी व्हायला पाहीजे. अशी पारदर्शकता काय कामाची मेरीट नेट-सेट- गोल्ड मेडॅलीस्ट हुशार अनुभवी व्यक्ती सोबत अशाप्रकारची वागणुक तुमची असेल तर त्या पदावर बसण्याची देखील लायकी नाही तुमची…
तुम्ही विसरत चालले की जास्तीत जास्त मागासवर्गीय मुलांच्या स्कॅालरशीप मुळे कॅालेज चालतात. गरीब कष्टकरी शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमुळेचं प्रवेश भरपुर होतात.
किती दिवस करणार पद असेपर्यंत नंतर कुत्र ही विचारणार नाही तुम्हाला…
लेखक: प्रा राहुल गोवर्धन माहूरे 9822278925