
दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा 2022 – 23 अंतर्गत किनखेड पूर्णा केंद्रामध्ये सर्कल सामन्यांचे आयोजन जिल्हा परिषद शाळा, किनखेड पूर्णा येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते या खेळ व स्पर्धेमध्ये प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सांघिक व वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे खेळात सहभाग नोंदविला आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

याप्रसंगी खेळ व स्पर्धेचे उद्घाटन रितसर करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख उस्थितीत किनखेड ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य तसेच केंद्रातील मुख्याध्यापक ,शिक्षक ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पालक व विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते….!