देगांव येथील फुले सार्वजनिक वाचनालयात सावित्रीमाई फुले जयंती साजरी

प्रतिनिधी/नागसेन अंभोरे

स्थानिक/अकोला

३ जानेवारी २०२५ रोजी देगांव ता. बाळापूर येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात तर्फे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज अंभोरे होते. त्यांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या दिव्य प्रतिमेस हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागसेन अंभोरे यांनी केले. त्याप्रसंगी तथागत अंभोरे, प्रांजली अंभोरे, अंजली अंभोरे, ईश्वरी गावंडे, आराध्या तायडे, राजस्त्री इंगळे, सलोनी शिरसाट, सीताबाई राऊत, रुपाली चहाकर आदिंची भाषणें झालीत.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी परिसरातील वाचकवर्ग, सान बालक -बालिका प्रामुख्याने उपस्थित होते. उत्तम शैलीत सुत्रसंचालन आकाश इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.