
तरुणाई फाउंडेशन कुटासा आयोजित
ता. अकोट जि. अकोला र. नं. महाराष्ट्र 208/2016 एफ क्र. 18927
राज्यस्तरीय विविध क्षेत्री गुणीजन पुरस्कार वितरण सोहळा 2022
यामध्ये सौ. जया भारती (इंगोले)राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली. तरुणाई फाउंडेशन गेल्या 13 वर्षांपासून विविध कार्यक्रमांचा आयोजन करत असतं याचे अध्यक्ष संदीप देशमुख आणि त्यांची संपूर्ण टीम दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन करत असतात. यावर्षी सुद्धा तरुणाई फाउंडेशन कुटासाच्या वतीने विविध क्षेत्रे गुरुजन चा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉटेल नैवेद्य नॅशनल हायवे खडकी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल मिटकरी प्रदीप गुरुखुद्दे हे उपस्थित होते.