संविधान दिनानिमित्त घेतली होती स्पर्धा परीक्षा

दगडपारवा : २६ नोव्हेंबर रोजी संविधान
दिनानिमित्त सत्यशील ग्रुपच्यावतीने दगड पारवा येथील प्रभूसिंग नाईक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काजळेश्वर येथील श्री संत बाबनाजी महाराज विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळेश्वर येते स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या . त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रजासत्ताकदिनी गौरविण्यात आले. सत्यशिल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमोल नवघरे यांच्या संकल्पनेतून परीक्षेत भाग घेणाऱ्या जि.प. शाळा व प्रभुसिंग नाईक विद्यालयतील विजयी विद्याथ्याना अबक तिन्ही गटात अनुक्रमे १, २, ३ बक्षीस व प्रमाणाताचे वितरण करण्यात आले जि. प. शाळेतील श्रावणी अनिल महल्ले वर्ग सातवा प्रथम क्रमांक, ईश्वरी दिनेश गवई वर्ग सातवा द्वितीय क्रमांक, प्रतीक्षा महादेव गवई वर्ग सातवा तृतीय क्रमांक, माहेश्वरी पुंडलिक भिसे वर्ग चौथा प्रथम क्रमांक, समित शिवचरण आमटे वर्ग सहावा द्वितीय क्रमांक, आर्यन संतोष कांबळे वर्ग सहावा तृतीय क्रमांक व प्रभुसिंग नाईक विद्यालया मधील स्नेहल दिनेश गवई वर्ग दहावा प्रथम क्रमांक , वैष्णवी गोपाल भोंगरे वर्ग दावा द्वितीय क्रमांक , वृक्ष भगवान इंगळे वर्ग दावा तृतीय क्रमांक , चैताली अंबादास पवार वर्ग नववा प्रथम क्रमांक, साक्षी प्रभाकर आठवले वर्ग नवा दुतीय क्रमांक, पुनम प्रमोद आडे वर्ग नववा तृतीय क्रमांक, नंदिनी विनोद चव्हाण वर्ग नववा तृतीय क्रमांक या सर्वांना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या
हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्यशिल ग्रुपचे उपाध्यक्ष धमपाल कांबळे सचिव ज्ञानेश्वर जामनिक उपसचिव जितेंद्र खंडारे कोश्याधश विकास घुगे , मंगेश नवघरे नागेश नवघरे सत्यशिल बहुउद्देशीय संथा अध्यक्ष संतोष गवई गौतम जामनिक महादेव गवई ज्ञानेश्वर कासव निलेश इंगळे गणेश गवई राजरत्न सावळे निखिल सुरवाडे दादाराव इंगळे सुरेश घुगे सुमंत नवघरे जीवन नवघरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.