
स्थानिक:
अकोला येथील बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराला उंच शिखरावर पोहचवत अकोल्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचविणारे महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सतीश चंद्र भट यांची अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथे अनेक वर्षा पासुन बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यात खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देवून त्यांचे आयुष्य उजळले आहे.
अकोल्यातील बोक्सींगची परंपरा कायम राखत महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत अकोल्याला अनेक सुवर्ण पदक प्राप्त करून देण्यात त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. अकोला बॉक्सिंग क्लब चे अनेक बॉक्सर हे वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत.
सतीश चंद्र भट यांच्या मार्गद्शनाखाली बॉक्सिंगचा चढता आलेख आणि क्रीडा क्षेत्राची होणारी भरभराट पाहूनच त्यांची अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.