
स्थानिक अकोला:
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडी यांनी अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देवून विविध मागण्या सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले. त्यात प्रामुख्याने अकोला ते अकोट मार्गे धावणारी रेल्वे पुन्हा सुरू करण्यात यावी. गोपालखेड पुलावरून रहदारी सुरू करावी.
अंदुरा येथील पुलाचे काम चालू करण्यात यावे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा पुन्हा सर्व्हे करण्यात यावा.
अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून देण्यात आले.
तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.