
स्थानिक: अकोला येथील नवीन तारफाईल मध्ये मिळालेल्या मोबाईलवर मालकी हक्क न दाखवता त्या तरुणाने माणुसकी जपत मोबाईल चक्क पोलिसांच्या हवाली केला.
नवीन तार फाईल येथील रहवासी असणारे संतोष नितोने असे त्या युवकाचे नाव आहे. रस्त्यावर वरून जाताना पडलेला मोबाईल दिसताच त्याने आजूबाजूला चौकशी सुरू केली पण तो मोबाईल नेमकं कुणाचा आहे हे समजत नव्हते त्यामुळे मोबाईल रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पी.आय. किशोर शेळके यांच्या स्वाधीन करण्यात आले. लवकर सदर मोबाईल हा संबधित व्यक्तीला सोपविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
तेव्हा बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर नकाशे, संतोष नितोने, मारुती वासनिक, अमोल उके,श्रावण रंगारी, राजू रामटेके, विकी सोनवणे आदी सहकारी उपस्थित होते.