संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघात आज भावेश बोपटे यांची निवड

अकोला/स्थानिक :
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला चा खेळाडू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आंतर विद्यापीठ स्पर्धेकरीता विद्यापीठ क्रिकेट संघात भावेश मनोज बोपटे यांची निवड झाली.
भावेश मनोज बोपटे हा खेळाडू गेल्या ८ वर्षापासून क्रिकेट मध्ये अतोनात मेहनत घेत आहे. क्रिकेट मध्ये ऑल राऊंडर म्हणून त्याला ओळखले जाते. महाविद्यालयातून नेहमीच त्याला शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संजय काळे सर, प्रा.नितीन वाघमारे सर, क्रिकेट क्रीडा प्रशिक्षक शुभम गोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे साहेब, प्रबंधक. राजेश गीते सर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा संजय तिडके, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संजय काळे सर, प्रा.नितीन वाघमारे सर, क्रिकेट क्रीडा प्रशिक्षक, शुभम गोळे, तसेच सर्व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.