
अकोला येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अकोला यांच्या वतीने स्कॉलरशिप परिषद १ फेब्रुअरी रोजी अशोक वाटिका येथे संपन्न झाली. या परिषदेत अध्यक्ष म्हणून पी.जे. वानखेडे,प्रमुख मार्गदर्शक महेश भारतीय (राष्ट्रीय खजिनदार वंचीत बहुजन आघाडी) तर विचार मंचावर सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे,श्रीकांत घोगरे युवक आघाडी अध्यक्ष,राजकुमार दामोदर महासचिव, नंदकुमार डोंगरे जिल्हा महासचिव भारतीय बौद्ध महासभा,रमेश सरकटे,मजर खान महानगर कार्यध्यक्ष , वैभव खडसे शहर अध्यक्ष युवा आघाडी , नितीन सपकाळ रुग्ण सेवा समिती सदस्य, , मोहित दामोदर बुलढाणा जिल्हाध्यक्ष, अभिषेक सपकाळ वाशिम जिल्हाध्यक्ष, प्राची दामोदर उपस्थित होते.
स्कॉलरशिप परिषदेमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी यांनी काही ठराव पारित केले.
१) स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात नियमित आले पाहिजे.
२) बार्टी, सारथी व महाज्योती सारख्या स्वायत्त संस्थेप्रमाणे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्था निर्माण करावी.
३) विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप ही चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी.
४) दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्क हे माफ करण्यात यावे.
५) समाज कल्याण विभागातील वस्तीगृह, मागासवर्गीय, आदिवासी आणि महिला वस्तीगृहाची तरतूद 2025 – 26 या चालू वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात यावी.
६) महागाई दरानुसार स्कॉलरशिपच्या पैस्यात वाढ करण्यात यावी.
७) बार्टी मार्फत ibps साठी देण्यात येणारी स्कॉलरशिप मध्ये वाढ करण्यात यावी.
८) स्कॉलरशिप संदर्भात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालय स्तरावर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे.
वरील वरील प्रमाणे हे ठराव स्कॉलरशिप परिषदेमध्ये पारित करण्यात आले. हे ठराव मंजूर करून अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी मार्फत मा. राज्यपाल, म. रा., मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मा. मुख्य सचिव,समाजकल्यान विभाग,मा. समाज कल्याण मंत्री,म.रा. यांना निवेदन देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात आदित्य बावनगडे, अक्षय डोंगरे, अंकित इंगळे, प्रथमेश गोपनारायण, अंकुश धुरंदर, श्रीकांत वाहूरवाघ, निखिल उपर्वट, शैलेश शिरसाट, आदित्य शिरसाठ, रिया खंडारे, आयुष समदूरे, आदित्य तायडे, शांतनु शिरसाट, रियांश मारवाल, कुणाल शिरसाट, अजय दाभाडे, पियुष तायडे, हर्षदीप गवई, याकूब खान पठाण, अंकुश बलखंडे, चेतन सरकटे, मेघा डोंगरे, आनंद इंगोले, सम्यक इंगोले, नागसेन अंभोरे, ऋषिकेश मालोकार, विश्वदीप गेडे, प्रथमेश आठवले, राजेश ठोंबरे, निखिल खांडे, चेतन शिरसाट, कृष्णा कदम, प्रहार सोळंके, शेखर इंगळे, अंकित करुण इंगळे, सुरज दामोदर,नागेश उमाळे,तनवीर सौदागर, प्रतीक शिरसाट, रमेश सरकटे, आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक जिल्हाध्यक्ष इंजि.धिरज इंगळे यांनी संचालन सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते विशाल नंदागवळी यांनी तर आभार आदित्य बावनगडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडी,युवक आघाडी,महिला आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन,भारतीय बौद्ध महासभा,विद्वत सभा यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.