स्थानिक : आज दि. 13 डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे काल विधान भवनात अजित पवारांनी ” PHD करून काय दिवे लावतील” या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील PHD संशोधक विद्यार्थी व सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याचे पदाधिकारीच्या कडून निषेध करण्यात आला.
यावेळी सम्यक चे जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष स्वरुप इंगोले, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे सोशल मीडिया सहप्रमुख अंकुश धुरंधर,जिल्हा सदस्य अंकुश ठाकरे,अभिषेक रोकडे ,नागेश डोंगरे,चेतन निचल,पुजा काळे, विकास तळेकर, निशांत झटाले,अजय इंगळे आदि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.