
-तेल्हारा प्रतिनिधी- (दि. २८ मार्च २०२३)
चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान अकोला यांचेकडून भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांना दि. ३० मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सम्राट अशोक पर्व महोत्सव, आबासाहेब खेडकर सभागृह रामदास पेठ अकोला येथे सम्राट अशोक साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती निमित्त अशोक प्रतिष्ठाणने राज्यस्तरीय चक्रवती सम्राट अशोक पर्व महोत्सवाचे आयोजन केले असून त्यासाठी मुख्य अतिथी व आकर्षक म्हणून माननीय राजेंद्रपाल गौतम (मा. सामाजिक न्याय मंत्री दिल्ली) यांची उपस्थिती राहणार असून सोबत अनेक भिक्षुची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक सुगत वानखडे (उद्योजक), अध्यक्षस्थानी प्रा. एम. आर. इंगळे तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. संजय खडसे (निवासी उपजिल्हाधिकारी) प्रा. डॉ. संतोष हुसे (ओबीसी नेतृत्व) राहुल तायडे (तहसीलदार नांदुरा) इत्यादींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. होऊ घातलेल्या कार्यक्रमामध्ये माननीय राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते राष्ट्रीय कीर्तनकार, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या मानवी मूल्यांचे प्रचारक मा. ह. भ. प. सत्यपाल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सोबतच भिमराव परघरमोल यांनाही सामाजिक तथा साहित्य क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल सम्राट अशोक साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. असे चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी एका पत्रकान्वय कळवले आहे.