
अकोट (प्रतिनिधी) –
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, १४ मे रोजी अकोटच्या नगर परिषद समोरील मैदानात एक ऐतिहासिक क्षण घडला. विविध बहुजनवादी संघटनांनी एकत्र येत ‘मूलनिवासी बहुजन समाज जोड़ो यात्रा’ आणि अभिवादन रॅलीच्या माध्यमातून अन्यायाविरोधात एल्गार पुकारला.
कार्यक्रमाला राज्यभरातील दिग्गज समाजसेवक, विचारवंत, संघटक यांची उपस्थिती लाभली. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी अध्यक्षीय भाषणातून संविधानावर चाललेले हल्ले, ओबीसी जनगणनेतील दिरंगाई, आदिवासींवर चाललेले षडयंत्र
व बिहार येथील महाबोधी महाविहर येथे झालेले मनुवाद्याचे अतिक्रमण यावर घणाघाती प्रहार केला.
प्रमुख मुद्दे जे ऐरणीवर आले:
ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेपासून सरकारचा पळपुटेपणा
संभाजीराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात पेशवाई कशी निर्माण झाली – ऐतिहासिक तपशीलासह चिंतन
नक्षलवादाच्या नावाने आदिवासींचा होत असलेला नरसंहार – शासक वर्गाचा डाव
वक्फ कायद्याद्वारे घटनात्मक मूल्यांची पायमल्ली
BTMC कायद्याद्वारे बौद्ध महाविहारांवर ब्राह्मणांचे वर्चस्व – गंभीर चर्चा
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. दिलीपभाऊ बोचे, राम ढीगर, दिवाकर गवई, गजानन दोड, नलिनी ताई गावंडे व अन्य मान्यवरांनी केले.
या रॅलीत महिलांचा, तरुणांचा शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
“मूळनिवासी बहुजन समाजाचा सत्तेचा रस्ता हा व्यवस्था परिवर्तनाच्या दारातून जातो” असा निर्धार उपस्थितांनी घेतला.