जळगाव प्रतिनिधी :
दिनांक 8 फेब्रुवारी रोजी राज्य अध्यक्ष मा. धर्मभुषण बागुल यांचे मार्गदर्शनानुसारतालुका भडगाव येथे समता सैनिक दलाची तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेची बैठक घेण्यात आली.जिल्हाध्यक्ष मा.किशोर डोंगरे (जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दल) हे बैठकीचे अध्यक्ष होते. जिल्हा संघटक आयु.जनार्दन जावरे, अरुण खरे व ज्ञानेश्वर सावळे (जिल्हा सहसचिव) यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.*या बैठकीत खालील प्रमाणे तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.*-अध्यक्ष – विजय मोरे , सचिव – रामजी जावरे ,उपाध्यक्ष – सतिश मोरे , सहसचिव – वाल्मीक पवार , कोषपाल – अमोल खैरे, संघटक – युवराज मोरे , संघटक – अविनाश मोरे , मिडिया प्रमुख – वाल्मिक मोरेसदर बैठकीत तालुक्यातील व शहरातील समता सैनिक दलाचे असंख्य सैनिक उपस्थित होते.नवनिर्मिती कार्यकारणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी महापुरूषांचा जयघोष करण्यात आला.