
अकोट :
तालुक्यातील आकोलखेड येथील रहिवासी असलेले समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांनी छेडलेल्या आंदोलनाची तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय असून सामाजिक धडपड समाज हिताची आहे करीता सहस्त्रबाहु कलाल समाज संघटन बहुउद्देशीय संस्था,अंजनगाव सुर्जी तर्फे सन्मानपत्र बहाल करण्यात येत आहे.
आपल्या दांडग्या नि प्रामाणिक कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वकर्तृत्वाची झळाळी लाभलेले हे कर्तृत्व आणि नेतृत्व आपल्या रुपाने बहरत राहो आणि आपल्या रुपाने चंदना सारखे लोकांसाठी झिजणारे निस्वार्थी नेतृत्व लाभो अशा आशयाच्या सन्मानपत्रासह सहस्त्रबाहु कलाल समाज संघटन बहुउद्देशीय संस्था अंजनगाव सुर्जी यांच्या वतीने अनिल इन मंगलम ॲन्ड लाॅन श्री क्षेत्र अष्टमासिध्दी मंदिर परतवाडा येथे कलाल समाज महासंमेलनाचे आयोजन ता.३० रोजी करण्यात आले होते.सत्राचे अध्यक्ष नरेंद्र धुवारे राष्ट्रीय संयोजक अखिल भारतीय कलाल समाज बालाघाट यांच्या हस्ते दिगंबर पिंप्राळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला बहुसंख्येने कलाल समाज बंधुभगिनी उपस्थित होते.