
दिनांक १२.०२.२०२४ रोजी माहे जानेवारी २०२४ मध्ये वयोमर्यादा नुसार सेवानिवृत्त झालेले ०१ पोलीस अधीकारी ०४ पोलीस अंमदार यांचा सत्कार समारंभ विजय हॉल येथे दुपारी ४ वाजता पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांचे शुभहस्ते सत्कार सोहळा पार पडला.
माहे जानेवारी २०२४ मध्ये वयोमर्यादा नुसार पोलीस अधीकारी पोउपनि / विजयकुमार मधुकर खडसे नेमणुक पो.स्टे. सिव्हील लाईन, सपोउपनि / अहमदखॉ रशिदखॉ पठाण नेमणुक पो.स्टे. बाळापूर पोहवा / अरुण लक्ष्मण मेतकर नेमणुक पो.स्टे. खदान, पोहवा / संजय अवधुतराव महल्ले नेमणुक पो.स्टे. हिवरखेड, पोहवा / रामानंद मणीरामजी भवाने हे सेवानिवृत्त झाले त्यांना शाल, श्रीफळ, भेट वस्तु व धनादेश देवुन पोलीस अधीक्षक रराहेब यांनी सन्मानीत केले. यावेळी प्रथमच मा. पोलीस अधीक्षक यांनी निवृत्त पोलीसांना गटविमा व रजा राखीकरण याचा धनादेश सेवानिवृत्तीच्या वेळी त्वरीत दिला त्यामुळे सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यानी समाधान व्यक्त करीत पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार मानले. यापुढेहि सेवानिवृत्त पोलीस अंमदार यांना सेवानिवृत्त सत्कार सोहळयालाच जास्तीत जास्त रक्कम देण्यात येईल, सोबतच मागील वर्षातील सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यांचे रोख रक्कम तसेच पेंशन लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे मत व्यक्त केले, यावेळी पोलीस कुटुंबिय यांची प्रमख उपस्थिती होती. सदर कार्यकमा करीता अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच शाखा प्रमुख, याची उपस्थिती होती.
सदर चा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके, यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. पोलस उपअधीक्षक श्री विजय नाफडे यानी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले.