अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधीकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार । व पुढिल वाटचालीस दिल्या शुभेच्छा !….

अकोला जिल्हा पोलीस दलातुन माहे एप्रिल मध्ये ०१ पोलीस अधीकारी व ५ अंमलदार वयोमर्यादा नुसार सेवानिवृत्त झाले. श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा निवृत्त पोलीस यांचा सहकुटूंब सत्कार सोहळ्याचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय, विजय हॉल अकोला येथे दिनांक ३०.०४.२०२४ रोजी सकाळी ११.००वा करण्यात आले. सेवानिवृत्त सत्कारमूर्ती, सपोउपनि /सुनिल ओंकार नवलाखे, सपोउपनि/प्रल्हाद शालीग्राम गवई, सपोउपनि संजय वसंतराव पटेकर, सपोउपनि/भारकर रायभान इंगळे, सपोउपनि/श्रीरंग आनंदराव चिंचोळकर, सपोउपनि । १५८१ श्रीकृष्णा कजधन गावंडे यांचा पोलीस अधीक्षक यांनी शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार केला. पोलीस कुटुंबातील सदस्य तसेच सत्कार मुर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मार्गदर्शन केले, व आपले आरोग्य संभाळण्याचा महत्वाचा सल्ला दिला, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांचे कुटुंबीयांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्रीमती धनश्री बोन्डे मॅडम कल्याण शाखा, यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. पोलीस उपअधीक्षक श्री. विजय नाफडे यांनी केले. सुत्र संचालन पोलीस हवालदार श्री. गोपाल मुकुंदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.