
उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे पथक व पोलीस स्टेशन रामदासपेठ, यांची सयुक्त धडक कार्यवाही दोन आरोपीतांना अटक करून त्यांचे गोडावुन मध्ये छापा मारून कि.अ.९,४२,५८८/-रु चा महाराष्ट्र प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला.मा. सतिश कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधीकारी, शहर विभाग अकोला यांना मिळालेल्या गुप्त माहीतीचे आधारे, चारजीन कंपाउंड, दगडीपूल चौक जवळ अकोला येथील एका टीनच्या गोडाऊन मध्ये शासनाने विक्री, वाहतूक व साठवणूक साठी प्रतिबंधित केलेला पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्था विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे. अशा गोपनीय माहीती वरून पोलीस स्टेशन रामदासपेठ येथील अधिकारी व पो. स्टॉफ अन्न व सुरक्षा अधिकारी व पंचासह सदर ठिकाणी जावुन कार्यवाही केली असता आरोपी नामे १) नितीन लालचंद अग्रवाल वय ५० वर्षे, रा. जवाहर नगर, डॉ. बोर्डे च्या दवाखान्याजवळ, अकोला २) विवेक रामसागर तिवारी वय ३३ वर्षे रा. कैलाश टेकडी, खदान अकोला यांचे ताब्यातुन नितीन अग्रवाल यांचे गोडावुन मधील साठवुन ठेवलेला महाराष्ट्र प्रतिबंधीत पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू अ१ कि.९,४२,५८८/-रु चा मुददेमाल जप्त करून आरोपी यांचे विरूध्द पोस्टे. रामदासपेठ, अकेला येथे अप.न. ८६/२५ कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i), कलम २६ (2) (iv), २७ (३) (d), २७ (३) (e) सहवाचन कलम 3 (i) (zz) व कलम ३० (२) (a) अन्वये अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कार्यवाही मा. श्री बच्चनसिंग पोलिस अधीक्षक अकोला, मा. श्री अभय डोगंरे अपर पोलिस अधीक्षक, मा. सतिश कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधीकारी, शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शना खाली मनोज बहुरे पोलिस निरीक्षक पो. स्टे रामदास पेठ अकोला, उपविपोअ शहर विभाग पथक पोउपनि सुशील कोडापे पोहवा अनील खेडकर, विजय जाधव, संदीप गुंजाळ, रवींद्र घीवे, पो.कॉ मोहम्मद नदीम, राज चंदेल सर्व एसडीपीओ पथक अकोला तसेच पोउपनि निलेश गायकवाड, पोहवा शेख हसन, किरण गवई, पोकॉ. श्याम मोहळे सर्व पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला व रवींद्र द्वारकादास सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी अकोला यांनी केली.