
अकोला: दसरा, दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. बाहेरगांवी असलेले सर्व कर्मचारी, अधिकारी, कामगार ह्या सणासुदीच्या दिवसात आपल्या गावी येतात व सण साजरे करतात तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी दिक्षाभुमी नागपूर व चैत्यभुमी मुंबई येथे अभिवादनाकरीता मोठ्या प्रमाणावर जातात त्यामुळे या प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये त्यांना आरामदायक प्रवास व्हावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी पश्चिम महानगर अकोला च्या वतीने दसरा-दिवाळी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर ते मुंबई, मुंबई- नागपूर कडे जाणा-या विशेष व अतिरिक्त गाडया सुरु करण्याबाबत मा.संतोष कवडे,रेल्वे प्रबंधक, रेल्वे स्टेशन, अकोला यांच्या मार्फत मंडळ रेल्वे प्रबंधक भुसावळ व नागपूर यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी महानगर पश्चिम च्या वतीने देण्यात आला.
यावेळी महासचिव गजानन गवई, उपाध्यक्ष सै. अलिमुद्दिन , महेंद्र डोंगरे, गजानन दांडगे, सुरेश कलोरे, रंजित वाघ, मिलिंद आकोडे,धनंजय ठाकूर, किशोर मानवटकर, मंगेश बलखंडे, , शाहीद खान,राजेश गोपणारायन, सुयोग इंगोले, गोकुळ मानकर,मयूर वाकोडे, सुभाष तायडे, मनोहर हेरोडे, रोहित काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.