एम आय डी सी येथील मजुरांना नोटीस न देता काढल्याने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन..

सम्राट अशोक सेनेतर्फे व्यक्त केला निषेध…

स्थानीक: अकोला येथे ३ नोव्हेंबर रोजी, सम्राट अशोक सेनेच्या वतीने अकोल्याचे जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. अकोला एमआयडीसी या ठिकाणी काही कामगार,सुरक्षा गार्ड यांना कामावरून कुठलीही नोटीस न देता त्यांना कामावरून काढण्यात आले. त्यात एकूण ४७ मजूर कामावरून कमी केले. ४७ घर उध्वस्त करणे याला जिम्मेदार कोण.? असा प्रश्न अशोक सम्राट सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

अमरावती सुरक्षा रक्षक मंडळ गार्ड बोर्ड मध्ये ए डी एम ऍग्रो प्लॉट नं एन 55 एम आय डी सी फेज नं 4 शिवणी अकोला महाराष्ट्र 444104 युनिट या कंपनीत काम करणाऱ्या मजुरांनी आपल्या कामाच्या पगारातून मुलांचे शिक्षण, आई-वडिलांचे पालन पोषण झालं पाहिजे यासाठी काही खाजगी कंपन्यांकडून व्याजाने पैसे घेतले आहे त्यांचे किस्त याच पगारातून भरत होते. या कामगारांना कंपनीने कुठलीही नोटीस न देता कामावरून कमी केले त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यातून अकोला जिल्ह्यात बिहार,युपी इथले मजूर एमआयडीसी अकोला येथे लावण्यात येत आहे. बाहेरून मजूर लावून स्थानिक मजुरांसोबत अन्याय करत असाल तर अशोक सम्राट सेने तर्फे निषेध व्यक्त करत कंपनीवर केस करत कंपनी बंद करण्यासाठी उपोषण करू असा इशारा देण्यात आला. आंदोलनामध्ये सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश शिरसाट, सर्व मजूर वर्ग व सामाजिक राजकीय पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.