स्थानिक: अकोला रेल्वे स्थानकावरील असलेल्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून या दोन्ही प्रवेशद्वारावरील फलके विकास कामासाठी काढण्यात आली होती. आता लावते वेळी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचेच कमानीला फलक लावण्यात आले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक अजूनही लावण्यात आले नाही. याचा परिणाम समाजावर वाईट पडू शकतो आणि गैरसमज होऊन धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते म्हणून रेल्वे प्रशासनाला लवकरच फलक लावण्यात यावे. अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. असे निवेदन अकोला स्टेशन मास्टर कवडे सर यांना वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे, महानगराचे महासचिव कुणाल राऊत, धीरज गणवीर, आदित्य बावनगुडे, रमेश गेडाम, श्रीकृष्ण यादव, गोट्या गणवीर,पियुष घोडेस्वार,साजन शेंडे, विनोद सुखदेवे, विनोद सहारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.