विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांची मागणी मान्य विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी ऑन
*प्रतिनिधी/संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे दि.24 जुलै 2023 रोजी कुलगुरू याना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत येत असलेल्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन करून पुढील वर्षात प्रवेश देण्यात यावा.
या मागणीचे निवेदन परत स्मरण करून देण्यासाठी 8 ऑगस्ट 2023 रोजी दिले व वारंवार याचा पाठपुरावा चालू होता.शेवटी मागणी मान्य न झाल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे 8 ऑगस्ट रोजी हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली होती.या निदर्शनाला व रास्त मागणीला सर्व राजकीय पक्ष व विद्यार्थी संघटनांनी जाहीर पाठिंबा सुद्धा दिला होता.व हे आंदोलन रात्री 10 वाजेपर्यंत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे चालले शेवटी विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.व 11ऑगस्ट रोजी अकॅडमिक कोन्सिल(विद्वत परिषद) ची तातडीची मीटिंग ठेवण्यात आली.व या मीटिंग मध्ये हा मुद्दा ठेवून त्यावर सर्व अकॅडमीक कोन्सिल सदस्य यांनी व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू, प्र-कुलगुरू, व कुलसचिव यांनी चार समित्या स्थापन केल्या व विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा नापास ची टक्केवारी काढली. व त्याआधारे पुन्हा आज 19 ऑगस्ट 2023 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांची ऑनलाइन अकॅडमिक कोन्सिल अर्थात विद्वत परिषदेची मीटिंग झाली व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान होवू नये करिता आमची मागणी मान्य केली.व विद्यार्थी हितार्थ घेतलेल्या निर्णयाबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासन व अकॅडमीक कोन्सिल सदस्य यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने जाहीर आभार विद्यार्थी नेते आकाश हिवराळे यांनी मानले त्यामुळ-विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे असे सर्वाना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांनी आवाहन केले.
प्रवेशादरम्यान काही अडचण असल्यास संपर्क साधावा.7387300933 असेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात जाहीर केले आहे. ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,डेमोक्रॅटिक युथ फ्रंट चे भूषण गवळी,संभाजी ब्रिगेड सागर कालमेघ, प्रांजल सदार,अंकुश वानखडे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.