सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.अशोक शिरसाट यांची ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारासाठी’ निवड

(अकोला / २७ नोव्हेंबर )

साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणारे सदस्य सुप्रसिध्द साहित्यिक तथा केन्द्रीय मानवाधिकार संगठन,नई दिल्ली -महाराष्ट्र राज्य व्हाईस प्रेसिडेन्ट, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष -डॉ. अशोक शिरसाट यांची आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था , मुंबई या संस्थेकडून सन-२०२२ च्या ‘राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारासाठी ‘ निवड झाली असून, सदरचे निवड पत्र आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.देवा तांबे मुंबई यांचेकडून डॉ. शिरसाट यांना प्राप्त झाले आहे.सदर पुरस्कार येत्या ६ डिसेंबर २०२२ (विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ) रोजी आकूर्डी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन हिवाळी अधिवेशन राष्ट्रीय पुरस्कार वितरण व महासदस्यता सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यांत येईल. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन देश विदेशातील विविध क्षेत्रांतले पदाधिकारी यांची उपस्थिती राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.