महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर…

वंचीत बहुजन युवा आघाडीच्या संघर्षाला यश…

स्थानिक : अकोला येथील वंचित बहुजन युवा आघाडीने संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ईमेल कालच रेल्वे अधिकारी ह्यांना पाठवले होते. त्यावर आज मुंबई मध्ये रेल्वे अधिकारी ह्यांच्या बैठकीत ह्या गंभीर विषयांवर चर्चा होवून ५ आणि ६ डिसेंबरचा मेगाब्लॉक रद्द न करता रद्द केलेल्या ट्रेन आंबेडकरी अनुयायांसाठी वेळेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार ह्यांची वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांना दूरध्वनी द्वारे दिली आहे. त्याच बरोबर १४ विशेष रेल्वे देखील त्या दिवशी सोडणार असल्याने आंबेडकरी अनुयायांना गैरसोय होणार नाही हे देखील कळविले आहे.

ब्लॉक असेल मात्र त्याचा कुठलाही परिणाम आंबेडकरी अनुयायांना घेऊन जाणाऱ्या गाड्यावर होणार नाही, असेही अभिवचन त्यांनी दिले आहे.मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवसाचे गांभिर्य न जपणारे ते अधिकारी कोण आहेत आणि सहा डिसेंबर च्या पूर्वसंध्येला हा मेगाब्लॉक का घेण्यात आला होता, ह्याची चौकशी करण्यात यावी ह्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार वंचित युवा आघाडीने केला आहे.

वरील बातमी सगळ्यात पहिले. वंचितांचा प्रकाश या वेब पोर्टल ने प्रसारित केले.

Leave a Reply

Your email address will not be published.