
अकोला: (दि १ जाने; २०२५)
स्थानिक शासकीय विश्राम गृह अकोला येथे १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वंचितांचा प्रकाश या साप्ताहिकाच्या दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील वंचित, शोषित,दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याच्या पाठीशी नेहमी उभे असणारे साप्ताहिक म्हणून वंचितांचा प्रकाश या वृत्तपत्राची ख्याती आहे. गेल्या ५ वर्षापासून फक्त अकोला जिल्ह्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक बातम्यांना प्रकाशित करून नागरिकां पर्यंत सत्य पोहोचविण्याचा प्रयत्न हे साप्ताहिक करीत असते. असे प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या मा. अरुंधती ताई शिरसाट यांनी केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचितांचा प्रकाश साप्ताहिकाचे मुख्य संपादक महेंद्र डोंगरे यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांनी वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या आणि दिनदर्शिकेचे विमोचन केले. यांचं कार्यक्रममध्ये जवळपास ३० पत्रकारांची नेमणूक करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्रे व ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाला संविधानाचे गाढे अभ्यासक प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे, मा. धैर्यवर्धन पुंडकर राज्य उपाध्यक्ष वं.ब.आ.,राजेंद्र पातोडे राज्य प्रवक्ते वं.ब.आ., डॉ. आशुतोष डाबरे अस्थिरोग तज्ञ,मा. मनोज बहुरे पी.आय. रामदासपेठ पो. स्टे., आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य, डॉ. रामेश्वर भिसे श्री शिवाजी महा. अकोला,प्राचार्य, डॉ. आर. डी. सिकची श्रीमती सीताबाई कला व वाणिज्य महा. अकोला,माजी प्राचार्य, डॉ. समाधान कंकाळ रा. तो. आयुर्वेद महा.अकोला, मा. प्रमोद भाऊ देंडवे (जिल्हाध्यक्ष वं.ब.आ.) मिलिंद भाऊ इंगळे (जिल्हा महासचिव वं.ब.आ.) वंदनाताई वासनिक (महानगराध्यक्ष वं.ब.आ.) गजानन भाऊ गवई (माजी नगरसेवक वं.ब.आ ) मा. मोहन यावले, समाजसेवक, मा. महेंद्र भाऊ डोंगरे मुख्य संपादक वंचितांचा प्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल माहूरे यांनी आभार प्रदर्शन उपसंपादक विशाल नंदागवळी यांनी केले.
