रविवारी लिंगायत समाजाचा वधू-वर परिचय मेळावा

अकोला सर्व शाखीय वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सिविल लाईन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात वीरशैव लिंगायत सर्व शाखीय उपवर वधू वर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी समाजाच्या वतीने झाली असल्याची माहिती वीर शैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. समाजाच्या यापूर्वीच्या परिचय संमेलनाला ही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 23 मार्च रोजी आयोजित उपवर वधू परिचय संमेलनातून सुर जुळलेल्या जोडप्यांचा सामूहिक विवाह ही करण्याचा आयोजन समितीचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या परिचय संमेलनात युवक युवतींची संपूर्ण माहिती असणारी परिचय पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटन खा. अनुप धोत्रे,आ.हरीश पिंपळे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून उपवर वधूची नोंदणी सुरू असून समाजातील युवक युवती पालकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सर्व उप वधू-वर यांनी वधू वर परिचय मेळाव्याला स्वतः प्रत्यक्ष हजर राहावे अशी विनंती मेळावा समितीचे सहसचिव डॉ. प्रा. संतोष पस्तापुरे यांनी केली आहे.या परिचय संमेलनात यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेश मिसे, कार्याध्यक्ष मधुकर पांढरकर, उपाध्यक्ष रवींद्र कारंजकर ,अतुल बिडवे, मुकुंद भुकन, डॉ नितीन बिडवे, सचिव अविनाश मिटकरी, गजानन आप्पा गोरटे, संतोष शिरोडकर, संजय आप्पा बालटे, अशोक आप्पा गोसटकर, राजेश हेगु , आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.