
अकोला : स्थानिक जुने शहर मधील हमजा प्लॉट निवासी तथा सामाजिक कार्यकर्ता राशेदा परवीन (रूबीना खान) यांना महाराष्ट्र राज्य वुमन वेल्फेयर च्या डायरेक्टर पदावर नियुक्त केले आहे. त्यांची नियुक्ती दिल्ली स्थित सार्वजनिक मानवाधिकार आणि अपराध नियंत्रण परिषद यांनी केली. श्रीमती राशेदा परवीन (रूबीना खान) ही सामाजिक, साहित्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सक्रिय आणि महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. सध्याचं त्यांची दिल्ली परिषदेच्या वतीने आयोजित एक कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली.
राशेदा परवीन यांना पूर्वी नारी शक्ति अवार्ड, सेल्यूट अवार्ड आणि इंडिया प्राइड अवार्ड व अतिरिक्त इंडियन आयकॉन अवॉर्ड ने सन्मानित केले आहे.
महिला आणि युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी राशेदा परवीन यांनी जिल्ह्यात महिला आणि युवतींसह आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रम आणि उपक्रमाची योजना तयार केली आहे. त्यांना मुख्यत: शिवण क्लास प्रशिक्षण आणि कम्प्यूटर प्रशिक्षण देणे, त्यांना नि:शुल्क शिवण मशीनें आणि कम्प्यूटर उपलब्ध करणे इत्यादि कार्य समाविष्ट आहे.
