
lदि. १६/०३/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास रेल्वे स्टेशन अकोला येथे फिर्यादी सौ. हर्षा हेमंत गावंडे रा. हिवरखेड जि. अकोला ह.मु. मलकापुर रोड अकोला यांचे गळयातील मंगळसुत्र अज्ञात व्यक्तीने जबरीने हिरकावुन पळून जात असतांना महिले सोबत हजर असणारा पती नामे हेमंत गावंडे यांनी रेल्वे स्टेशन ते रेल्वे क्वार्टर चे मागे, किकेट टर्फ मैदान पर्यंत अंदाजे ५०० मिटर पाठलाग केला. त्यावेळी सदर आरोपीस हेमंत गावंडे यांनी पकडुन झटापट करत असतांना आरोपीने हेमंत यास दगडाने त्यांचे तोंड ठेवुन गंभीर जखमी केले आणि जखमीचे हातातील चांदीचे ब्रासलेट व मोबाईल घेवुन अज्ञात आरोपी फरार झाला होता.
चैन स्नॅचिंग ची घटना रेल्वे प्लॅटफॉर्म वर झाली असल्याने रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे अप क. ५८/२०२५ कलम ३०४(२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच फिर्यादीचे पतीवर आरोपीचा हल्ला हा पो.स्टे. रामदासपेठ व्या हद्दीत येणा-या क्रिकेट टर्फ जवळ झाला असल्याने पो.स्टे. रामदासपेठ अकोला येथे अप क. ९५/२०२५ कलम १०९ (१), ३०९ (६) भा.न्या.सं. वा गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाची गंभिरता पाहता जी.आर.पी. चे प्रभारी अधिकारी व स्वतंत्र पथक हे चैन स्नेविंग चा संबंधाने आरोपीचे शोथ कामी खाना झाले होते. तसेच पो.स्टे. रामदासपेठ हद्दीतील घटने संबंधाने मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. सतीष कुलकर्णी सा. व स्थागुशा अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके, पो.नि. मनोज बहुरे पो. स्टे. रामदासपेठ अकोला यांचे वेगवेगळे पथक हे संयुक्तरित्या आरोपीच्या मागावर होते. सर्व पथके हे वेगवेगळया मार्गाने सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी शोधण्याचा प्रयत्न करीत होते. सि.सि.टी. व्ही फुटेज द्वारे मिळालेले संशयिताचे छायाचित्र समाजमाध्यमावर स्था. गु.शा. अकोला कडुन प्रसिध्द करण्यात आले होते.
त्यानंतर आरोपीचा शोध व्हावा याकरिता पो. नि. शंकर शेळके, स्था.गु.शा. अकोला यांनी त्यांचे अधिनस्त असलेले पो.उप.नि. गोपाल जाधव यांचेसह पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीचे आधारे गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचे नाव निष्पन्न केले तसेच मिळालेल्या बातमीच्या आधारावर सापळा खुन एम.आय.डी.सी. अकोला परिसरात फरार असलेला मध्यप्रदेश येथील आरोपी नामे रवि नथ्थुलाल परमार वय ३९ वर्ष रा. ग्राम कुंदाना, ता. कुंदाना सानवेर जि. इंदौर (मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. सदर आरोपीने रेल्वे स्टेशन व रामदासपेठ दोन्ही गुन्हयातील कबुली दिली असुन चैन स्नॅचिंग व्या घटनेतील चैन व पो.स्टे. रामदासपेठव्या घटनेतील ब्रासलेट कि.अं. ९५,०००/ रू या मुद्देमाल आरोपीजवळुन पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी हा मध्यप्रदेश येथील इंदौर चा रहवासी निष्पन्न झाला असन तो आर्म अॅक्ट व चोरीच्या गुन्हयात फरार असल्याने दिनांक ११/०३/२०२५ पासुन अकोला येथे बलोदे लेआऊट भागात भाडयाने राहत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. रामदासपेठ अकोला यांचे ताब्यात दिल्या नंतर पो.स्टे. रामदासपेठ येथील गुन्हयातील जखमी हा मृत झाल्याची माहिती समोर आली असुन सदर गुन्हयामध्ये खुनाच्या कलम वाढीची पुढील कारवाई पो.स्टे. रामदासपेठ पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री. सतिश कुलकर्णी सा. व स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी पो.नि शंकर शेळके, पो. नि. मनोज बहुरे पो.स्टे. रामदासपेठ अकोला, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण LCB अकोला, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार वसिम शेख, रवि खंडारे, स्वप्नील खेडकर, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अमोल दिपके, मोहम्मद आमीर, अशोक सोनवणे, तसेच पो.स्टे. सि. लाईन येथील पो. हवा किशोर सोनोने यांनी ही कारवाई केली.