
अवकाळी पावसामुळे यावर्षी खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला . ही आर्थिक चणचण भरून काढण्यासाठी शेतकर्यांना आता रब्बी पिकांशिवाय पर्याय नाही , त्यामुळे शेतकरी आता रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली. रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभर्याचे पिक घेतात .
वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकय्रांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते . सोन्यासारखं पिक घरात आल्यानंतर देखील त्या पिकाला योग्य हमीभाव मिळेल का ? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी तरी रब्बी पिकांच्या पेरणी तून शेतकर्यांना आर्थिक वाट मिळेल का ? हा कळीचा मुद्दा आहे..