जिल्हा परिषद सभापती पदासाठी महिलांनी मारली बाजी

स्थानिक: अकोला
नुकताच जिल्हा परिषद सभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. त्यामधे वंचीत बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात ही लढत होती. २५ विरुध्द २७ अशा प्रकारच्या लढत मध्ये वंचित बहुजन आघाडीने विजय प्राप्त करत चार ही सभापती पदी आपले उमेदवार घोषित केले.

त्यामध्ये समाज कल्याण सभापती म्हणून आम्रपाली ताई खंडारे व महिला व बाल कल्याण सभापती म्हणून रिजवाना परवीन यांची निवड झाली आहे. विषय समिती सभापती म्हणून मायाताई नाईक आणि योगिता ताई रोकडे यांनी निवड झाली. या नवनिर्वाचित उमेदवारांना पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.