अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘प्रबुद्ध भारत’ दिनदर्शिकेचे प्रकाशन!

१ डिसेंबरपासून सर्वत्र उपलब्ध ;

ऐतिहासिक माहितीसाठी घ्या प्रबुद्ध भारत दिनदर्शिकापुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आणि सध्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाक्षिक “प्रबुद्ध भारत”च्या नवीन वर्षाच्या (२०२३) दिनदर्शिकेचे उद्घाटन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. १ डिसेंबरपासून प्रबुद्ध भारत दिनदर्शिका बाजारात उपलब्ध होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक प्रबुद्ध भारतमधून बहुजन, कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटना, घडामोडींचे विश्लेषण आणि बातम्यांसाठी प्रत्येकाने प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन करून अ‍ॅड. आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि प्रबुद्ध भारतचे संपादक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी नुकताच हा कार्यक्रम झाला.या वेळी प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत, पत्रकार वैभव खेडकर, भारतभूषण कोल्हे, स्वेल वाघमारे आदी उपस्थित होते. दिनदर्शिकेचे डिझाइन प्रवीण आगळे यांनी बनवले आहे.

प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेसाठी संपर्क -जितरत्न – 7385550633वैभव – 8421969717

ईमेल – eprabuddhbharat@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published.