
अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे दिनांक २८ मे २०२३रोजी सायं. ५ वा.आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला येथे होणाऱ्या स्वर काव्य महोत्सवात काव्यगंध या कविता संग्रहाचे प्रकाशन व सेवाश्री २०२३ पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग बांधवांनी लिहिलेल्या कविता ISBN ९७८-९३-५८९१-०६३-६ क्रमांक प्राप्त काव्यगंध या कविता संग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे. या कविता संग्रहाचे संपादक व प्रकाशक म्हणून प्रा.विशाल कोरडे यांनी कार्य केले आहे. सदर कविता संग्रहातून मिळणारा निधी दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. ह्याच कार्यक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे सेवाश्री २०२३ हा पुरस्कार संगीतकार कौशल इनामदार व अभिनेत्री इरावती लागू यांना समाज कल्याण अधिकारी डि.एम.पुंड व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने दिव्यांगांना सहकार्य केल्याबाबत हा पुरस्कार दिला जाणार आहे.

प्रकाशन व पुरस्कार सोहळ्याला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा दिव्यांग नोंदणी व कार्यक्रमाच्या प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाइन ९४२३६५००९० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अनामिका देशपांडे, आम्रपाली बलखंडे,अरुण राऊत ,जया देशमुख, सुजाता आसोलकर, विनोद टीकार,हेमंत उपरीकर, अथर्व मेरेकर,हर्षा पाठक यांनी केले आहे.