
प्रतिनिधी: शिलवंत शिरसाट
स्थानिक :
जिल्हा परिषद अकोला येथील सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य झाले असून कित्येक दिवसापासून या शौचालयाची आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्याने जिल्हा परिषद मध्ये संपूर्ण अकोला जिल्ह्यामधून कामानिमित्त येणारे सामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास होताना पाहायला मिळत आहे.
एकीकडे प्रशासन स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करताना दिसते तर दुसरीकडे आपणच स्वच्छतेचा मंत्र विसरलोय म्हणून आपल्याच परिसरात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापर करता येत नाही म्हणुन इतरत्र उघड्या जागेचा वापर कामानिमित्त येणाऱ्या नागरिक करताना दिसत आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली असते. महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छता गृहाला तर चक्क टाळा लावून ठेवला आहे. त्यामुळे महिलांनी स्वच्छतेसाठी जावे कुठे हा प्रश्न उपस्थित होतो आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक बोलत आहे.