फुले आंबेडकर विद्वत सभेचे आयोजन….
स्थानिक: फुले आंबेडकर विद्वत सभा अकोला जिल्ह्याच्या वतीने संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन दिनांक 26 11 2022 ला सायंकाळी सहा वाजता सम्यक संबोधी सभागृह रणपिसे नगर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. देवदरीकर सर, विभागीय समन्वयक पश्चिम विदर्भ हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मा.डॉ.अनिल काळबांडे, संविधानाचे गाढे अभ्यासक, मुळावा जि. यवतमाळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. अरुंधतीताई सिरसाट राज्य महासचिव, महिला आघाडी वंचित बहुजन आघाडी हे होत्या. तर प्रमुख उपस्थितामध्ये डॉ. रमेश इंगोले, विभागीय समन्वयक, जिल्हा बुलडाणा हे होते. कार्यक्रमाची सुरूवातीला प्रतिमा पूजन व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आदित्य बावनगडे यांनी केले.
प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात ‘भारतीय संविधाना पुढील आव्हाने’ या विषयावर बोलत असताना म्हटले ‘‘भारतीय समाज विविध धर्म-संस्कृतीचा आहे त्याला एकसंध बाधण्याचे काम कोणी केले असेल तर ते संविधानाने केले आहे. परंतु आज संविधानाला विरोध करणारेच जर सत्तेवर असतील तर संविधान कितीही चांगले असले तर त्याचा काही फायदा होणार नाही. आज खऱ्या अर्थाने जर कोणाला देशसेवा करावयाची असेल तर त्याने संविधानाचे रक्षण करणे, त्याप्रमाणे वागणे-आचरण करणे गरजेचे आहे.’’ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. संजय पोहरे यांनी फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या कार्यक्रमातून प्रबोधनाची प्रक्रिया सुरू राहिल असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.संदिप डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अनिता गवई यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भाउराव सोनोने, ॲड.एम.एस.इंगळे, सिध्दार्थ शामस्कार, सचिन वरठे, डॉ.अशोक वाहुरवाघ, विशाल नंदागवळी, सनी उपर्वट यांनी सहकार्य केले.