स्थानिक: अकोला जिल्हा पोलीस दलातील एकुण १०१ पोलीस अमलदार यांना मा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी दिनांक १२.०६.२०२३ रोजी पदोन्नती दिली. अकोला जिल्हा पोलीस दलात नेमणुकीस असलेले एकुण ६७ नाईक पोलीस कॉन्स्टेबल यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली असुन एकुण ३४ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती आदेश पोलीस अधीक्षक अकोला श्री. संदीप घुगे यांनी दिनांक १२.०६. २०२३ रोजी निर्गमित केले आहे. त्यामुळे पदोन्नती झालेल्या अमंलदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.