
स्थानिक: अकोला येथील दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी व सामर्थ्य फाउंडेशन, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामर्थ्य व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी गुंफले.

परिस्थिती आज आणि उद्या या विषयावर बोलतांना त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व सखोल विवेचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी ॲड.मोतीसिंह मोहता व विचारमंचावर प्रबोध देशपांडे अध्यक्ष सामर्थ्य फाउंडेशन, अकोला उपस्थित होते. व्याख्यानाला अकोल्यातील मान्यवर, विचारवंत, श्रोते यांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामर्थ्य फाउंडेशन अकोला यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.