राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

अकोला, दि. २५ : निवडणूक हा लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव व मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग आवश्यक असतो. त्या दृष्टीने सातत्यपूर्ण जनजागृती करावी असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी अनिता भालेराव, तहसीलदार परशराम भोसले, सुरेश कवळे, शाम धनमने, गौरी धायगुडे, श्याम राऊत, सूचनाविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.प्रारंभी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा व्हिडीओ संदेश प्रक्षेपित करण्यात आला. विविध मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. निवडणूक जनजागृती कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व चित्रकला, रांगोळी, निबंध आदी विविध स्पर्धांमधील गुणवंतांना यावेळी गौरवण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी मतदान विषयक जनजागृती नाटिका सादर केली. गोपाळराव सुरे यांनी सूत्रसंचालन केले. गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.