
अकोला: (दि २२ जानेवारी २०२५):-
महापुरुषांचा वैचारीक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आज युवकांवर आली आहे. भावी पिढ्या समृद्ध व्हायच्या असतील तर आपल्याला महापुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. देशातील विविध समस्यांचे समाधान महापुरुषांच्या विचारत चं आहे. आपण व्यवस्थापनाचे विद्यार्थी आहात नियोजन, नियंत्रण, समन्वय ह्या घटकांची संपूर्ण माहीती आपल्याला महापुरुषांच्या चरित्रातुन चं मिळते यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे सांगुन आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या विचारांची कास धरा.. स्थानिक जठारपेठ अकोला स्थित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंटचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबीर दत्तक गाव कापशी रोड येथे आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा. राहुल माहुरे यांनी वरील प्रतिपादन केले.
याप्रसंगी विचारपीठावर संस्थेचे अध्यक्ष विवेक डवरे, प्राचार्य डॉ. रक्षा डवरे, आदर्श कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक नाना कीरतकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी रोशन कोरडे,सोहम डोईफोडे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अपर्णा ओईंबे यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा मोरे यांनी केले.कार्यक्रमासाठी रासेयो चे सर्व समन्वयक तसेचं महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.