अकोला-(दि.२७ एप्रील,२०२३):-स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय,अकोला चे विद्यार्थी चंद्राकांत बबनराव धुमाळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने वाणिज्य या विषयात आचार्य पदवी देवुन सन्मानित केले आहे.महाराष्ट्रातील प्रसिध्द फुले, शाहु आंबेडकरी विचारवतं, तथा माजी उप-प्राचार्य प्रोफेसर डॅा एम आर इंगळे, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांच्या मार्गदर्शनात ““ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांची वर्तणूक आणि त्यांच्या मूलभूत व चैनिच्या वस्तू खरेदी करण्याचा कल: एक तुलनात्मक अध्ययन विशेष संदर्भ:- अकोला जिल्हा” या विषयावर त्यांनी संशोधन करुन प्रबंध सादर केला होता.
अत्यंत हलाखीच्या परिस्थतीतुन शिक्षण घेत चंद्रकांत यांनी हे यश संपादन केले आहे. त्याची आई श्रीमती आशाताई धुमाळे यांनी चंद्रकांचे वडील गेल्यानंतर मोठ्या कष्टाने मुलाला शिकवले.चंद्रकांत च्या सर्व शैक्षणीक घडामोडीतडॅा एम आर इंगळे यांचे त्याला खुप सहकार्य लाभले हे विशेषत्याच्या यशाचे श्रेय तो आई-वडील, बहीण, प्रोफेसर डॅा एम आर इंगळे यांना देतो.त्याच्या या यशाबद्दल डॅा रोनिल आहाळे, प्रा राहुल माहुरे, प्रा ॲड आकाश हराळ, डॅा अमित गवई, विशाल नंदागवळी, अमीत लोंढे, आदित्य बावनगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.शहरातील सर्वचं स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उचललेल्या पाऊलातुन पाऊल वाट व्हावी आणि भटकलेल्या वंचितांना नवी वाट दिसावी ही अपेक्षा.