
अकोला- (दि. २३ मार्च, २०२५)- स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे कंत्राटी तत्वावरील इंग्रजी विभागातील शिक्षक प्रा. ॲड. आकाश हराळ बार कौन्सिल ऑफ इंडिया च्या नागपुर येथे पार पडलेल्या (AIBE)All India Bar Examination -XIX)परीक्षा पहिल्याचं प्रयत्नात उत्तीर्ण झाले. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ही बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे वकिलीची प्रॅक्टिस सुरू करू इच्छिणाऱ्या कायद्याच्या पदवीधरांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला भारतातील कोणत्याही न्यायालयात प्रॅक्टिस करता येते. ॲड आकाश हराळ हे श्री महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थी दशेत असतांना पहिल्याचं प्रयत्नात एम ए इंग्रजी मध्ये विद्यापीठातुन मेरीट आले.नंतर पहिल्याचं प्रयत्नात प्राध्यापक पदासाठी असलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर पहिल्याचं प्रयत्नात नेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाले.सोबत चं पहिल्याचं प्रयत्नात एल एल एम परीक्षा पास झाले.समाजमन जपणारा, परिस्थितीशी नेहमीचं संघर्ष करणारा हा यौध्दा आणखी एका नव्या यशाचा मानकरी ठरला. हि बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आणी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते आई-वडील, भाऊ आणी प्रोफेसर डॅा एम आर इंगळे यांना देतात. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वदुर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्राचार्य डॅा रामेश्वर भिसे, डॅा. संजय पोहरे, डॅा. मनोहर वासनिक, प्रा. प्रकाश गवई, डॅा.रोनिल आहाळे, डॅा.अनिल तिरकर, महेंद्र डोंगरे, प्रा.राहुल माहुरे, अजिंक्य धेवडे, विक्की मोटे, विशाल नंदागवळी, आदित्य बावनगडे, शुभम गोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.