
दिनांक १८/०१/२०२५ रोजी पो स्टे बाळापुर जि. अकोला येथे फिर्यादी नामे जाकीर हुसैन शेख रहीम उदीन वय वर्ष ४६ वय रा. भिम नगर जुनेशहर अकोला यानी फिर्याद दिली की, दि. १७/०१/२०२५ रोजी त्याचा मालकीचा ट्रक ज्या मध्ये तुरीचे दाळीचे कटटे असुन तो ट्रक रिधोरा पेट्रोल पंप येथे उभा केला असता ट्रक मध्ये असलेले तुरीचे दाळीचे २७ कटट्टे ज्याची की. अं.४०,०००/- रू चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी घेवुन गेले आहेत, अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून पो स्टे बाळापुर अकोला येथे अप क २४/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय सहींता प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपासावर आहे.
सदर गुन्हयात पोलीस स्टेशन बाळापुर सह समांतर तपास करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिल्यावरून सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गोपनिय माहीती प्राप्त केली असता यातील आरोपी नामे १) पवन अनिल काळे वय वर्ष मजुरी रा. गायत्री नगर बाळापुर नाका अकोला २) अवि राजु सोयाम वय २१ वर्ष. व्यवसाय मजुरी रा. गोंड पुरा डाबकी रोड, अकोला ३) संतोष देविदास आलोट वय २९ वर्ष व्यवसाय मजुरी रा. गायत्री नगर, रूद्रअवतार हनुमान मंदीर राजेश्वर कॉलनी बाळापुर नाका, अकोला ४) संजय गजानन उगवेकर वय ३ वर्ष रा. शिवसेना वसाहत शिवाजी चौक अकोला (अॅटो चालक) यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यांचे कडुन गुन्हयात चोरी गेलेले तुरदाळ चे १९ कट्टे कि. २८,५००/ तसेच गुन्हयात आरोपीतांनी चोरी करून माल वाहून नेण्याकरीता वापरण्यात आलेला ई अॅटो क MH-30-BC-3789 कि अ ३,००,०००/रू असा एकुण ३,२८,५००/रू चा माल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपी तसेच जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन बाळापुर येथे पुढील तपास करीता देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री अभय डोंगरे सा. यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पोहवा फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, पो. कॉ अभिषेक पाठक, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, चालक
. पो. हवा. अक्षय बोबडे यांनी केली.