कारागृहातुन सुटणा-या गुन्हेगारांवर अकोला पोलीसांचे लक्ष

आजकाल समाजामध्ये वाईट प्रवृत्ती मुळे अनेक लोक गुन्हेगारी कडे वळतात आणि चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, खून, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे करतात, आणि वेळ प्रसंगी त्यानां जेल ची हवा खावी लागते, काही वेळा अनेक गुन्हे करून सुध्दा हे गुन्हेगार जेलमध्ये जातात, दादा, भाई गिरी, गुंडा गर्दी करणारे काही गुन्हेगार जेल मधून सुटल्यावर, मिरवणूक काढणे, रस्त्यावर केक कापणे, अशा गोष्टी करून त्याचे रिल बनवुन समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचे विविध ठिकाणी आढळून आले आहे.

अश्या प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यसाठी कारगृह प्रशासन व अकोला पोलीस दल यांनी समन्वय ठेवून कारागृहातुन सुटना-या आरोपीतांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

मा. पोलीस अधीक्षक यांनी अशा गुन्हेगार लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल ला विशेष Cyber-Patroling बाबत सूचना दिल्या आहेत, जेल मधून आरोपी सुटल्यावर त्याची तात्काळ नोंद घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली जाते अशा गुन्हेगावर विशेष लक्ष ठेवून त्याने पुन्हा गुन्हा करू नये यासाठी, पोलीस स्टेशन स्तरावर प्रतिबंध कार्यवाही करण्यात येते, सन २०२४ मध्ये मालमत्ता व शरिरांवियध्द गुन्हे करणारे जेल रिलीज १८१ आरोपी वर तसेच सन २०२५ मध्ये जेल रिलीज १३ आरोपीतावंर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असून, ही कार्यवाही यापुढे ही अशीच सुरु असणार आहे. तसेच जिल्हा कारागृहातुन सुटणारे गुन्हेगार लोकांच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता अकोला जिल्हयामध्ये CRISP योजना पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात येत असुन त्यामध्ये आरोपीतांना चेक करण्यात येते. त्यामुळे आरोपीतांचे हालचालीवर विशेष लक्ष ठेवण्यात येते. पो.स्टे. स्तरावर कोंबिग गस्त च्या माध्यमातुन आरोपी आस्कमित चेक करण्यात येतात व आवश्यकते नुसार कायदेशिर कारवाई करण्यात येते.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, अशा प्रकारचे अशांतता प्रस्तापित करणारे कृत्य आढळून आल्यास तात्काळ ११२ नंबर वर माहिती द्यावी किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन शी संपर्क करावा. पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.